शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे शिलटे ग्रामपंचायत हद्दीतील तलावात सापडले पुरातन काळातील अवशेष

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम भागातील शिलटे ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या तलावात पुरातन काळातील अवशेष सापडले आहेत.

या सापडलेल्या अवशेषांची पालघर महसूल विभागाचे नायब तहसीलदार संभाजी पावरा व मंडळ अधिकारी यांनी पाहणी केली असून जुन्या तलावात खोलवर खोदकाम केल्यास पुरातन काळातील जुन्या वस्तूंचा साठा व येथे राहणाऱ्या जुन्या संस्कृतीचा नवा शोध पुरातन विभागाला लागू शकतो असा तर्क या गावातील ज्येष्ठ नागरिकांनी वर्तवला आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेल्या शिलटे ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या तलावाचे खोदकाम आणि गाळ काढण्याचे काम मे 2023 रोजी चालू असताना पुरातन काळातील अवशेष सापडले होते.

या अवशेषांमधे दगडाच्या मूर्तीवर कोरीव काम केलेल्या मनुष्य आकाराच्या मुर्त्या, गोल नक्षी काम केलेले दगड, पांढऱ्या रंगाचे नक्षीकाम केलेले पोल असे जुने पुरातन अवशेष सापडले होते.

यानंतर 2023 च्या जून-जुलै महिन्यात पाऊस पडल्यामुळे सर्व पुरातन अवशेष पाण्याखाली गेले होत. याबाबत गावात सर्वत्र चर्चा चालू असताना मे 2024 रोजी तलावातील पाणी संपल्यावर हे अवशेष गावकऱ्यांना पुन्हा आढळून आल्यावर गावातील जागृत नागरिकांनी याबाबत प्रशासनाला वर्दी दिल्यावर रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी पालघर नायब तहसीलदार संभाजी पावरा, मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील, तारापूर मंडळ अधिकारी सुनील राठोड यांनी घटनास्थळी पाहणी करून याबाबत अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पुरातन विभागाला सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button