“डोळे येणे” या साथीचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय करावे–डाॕ, रामचंद्र मोहिते.
उपसंपादक——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ——– 97 30 867 448
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक या साथीच्या रोगाने त्रस्त झाले असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे सध्या डोळे येणे या स्वातीचा आजार सर्वत्र पसरत आहे वातावरण बदल झाल्यामुळे विचित्र रोगाचे विषाणू हवेतून पसरू लागले आहेत त्यामुळे सर्वत्र डोळे येण्याच्या साथीने जोर झाला आहे त्याचा परिणाम शाळकरी मुले शेतमजूर व्यावसायिक यांच्यावर होत असून त्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती माळशिरस डॉक्टर रामचंद्र मोहिते यांनी याबाबत नागरिकांना खालील आवाहन केले आहे
काही ठिकाणी डोळे येणे म्हणजेच कंजक्टिवाईटीस रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या ऐकत आहोत.अद्याप पर्यंत तालुक्यातून जास्त प्रमाणात रुग्ण निघाल्याचे अहवाल प्राप्त नाहीत.तरी परंतु सदर आजाराविषयी आपणास प्राथमिक माहिती व प्रतिबंधात्मक उपाय माहिती असणे गरजेचे आहे.
1)लक्षणे:-
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे.जो विशेषता पावसाळ्यात होतो. एक किंवा दोन्ही डोळ्यांना त्याचा संसर्ग होतो.
डोळ्यांना खाज चिकटपणा येणे
डोळ्यांना सूज येणे
डोळे लालसर होणे
डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे.
2) प्रतिबंध व उपाय
डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
गॉगल चष्म्यांचा वापर करा.
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
संसर्गजन्य असल्याने डोळे आलेल्या व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी गॉगल घालून आणि काळजीपूर्वक जावे.
सर्व संसर्गजन्य आजाराबाबत संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट रोजी “आरोग्य संजीवनी अभियान”अंतर्गत जनजागृती व प्रतिबंध केला जाणार आहे.
डाॕ.रामचंद्र मोहिते.
तालुका आरोग्य अधिकारी,
पंचायत समिती माळशिरस