माळशिरस तालुक्यात डोळे येण्याच्या रोगाच्या साथीने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त.–नुरजहाँ शेख

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आसल्यामुळे ग्रामीण भागात विविध साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे.खेड्यातील नागरिक मात्र या साथीच्या आजारांमुळे त्रस्त झालेले असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.सध्या डोळ्यांच्या साथीचे आजारी सर्वत्र दिसू लागले आहेत.
वातावरणात बदल झाल्यामुळे विविध रोगांचे विषाणू हवेतून पसरू लागले आहेत .यामध्ये खेड्या-पाड्यात डोळे येण्याच्या साथीने जोर धरला असल्यामुळे त्याचा परिणाम शेती व्यवसायात काम करणारे कामगार व त्याच बरोबर शाळेत येणा-या विद्यार्थींची संख्या रोडावली आहे.या डोळे येण्याच्या साथीमुळे डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येत आहे.एकमेकांना लगेच डोळ्यांची लागण होत आहे.

माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील शेतीत काम करणार-या मजूराना,गावाकऱ्यांना डोळे आले असल्यामुळे शेतीतील मजूरा अभावी कामे खोळंबली आहेत.तसेच घरातील एकास डोळ्याची लागण झाली की संम्पूर्ण घरातील लहान थोरांना ही लागण होत आहे आणि त्यामुळे संपूर्ण घर स्वतःला कॉरनटाईन करत आहेत.



