दलित महिला नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांचे संविधानिक अधिकार नाकारणाऱ्या संबंधित उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

बी.टी.शिवशरण
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांना नगरपंचायत कामकाजात सामावुन न घेणे त्यांच्या परस्पर प्रशासकीय निर्णय घेणे दलित महिला आहे नगराध्यक्षा असतानाही त्यांच्या पदाला सन्मान न देणे नगराध्यक्षा यांनी बोलावलेल्या बैठकीला मुद्दाम न येणे अपमान होईल असे वर्तन नगरपंचायत मधील सत्ताधारी नगरसेवक अधिकारी व इतर कर्मचारी यांचेकडून सतत हीन वागणूक दिली जाते या आशयाची तक्रार व पाच पाने निवेदन असलेल्या तक्रारी सोलापूर जिल्हा अधिकारी व नगरविकास. सहाय्यक आयुक्त यांचे कडे महाळुंग श्रीपूर नगरपंचायत नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांनी दिले आहे
या बाबत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की नगरपंचायत मधील गटबाजी आहे आमचा काही संबंध नाही मी नगराध्यक्षा यांना कधीच तशी वागणूक दिली नाही त्यांचा नेहमी आदर व सन्मान करत असतो राजकीय नेत्यांच्या आपसातील मतभेद गटबाजी असु शकते त्यात माझा कसलाही संबंध नाही उपनगराध्यक्ष भिमराव रेडे पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले मला यातील काहीही माहीत नाही नगराध्यक्षा यांनाच काय तो प्रकार माहित याबाबत फोनवर बोलण्या पेक्षा उद्या समक्ष भेटून बोलतो मी अकलूजला आहे आज दिवसभर नगराध्यक्षा यांनी केलेल्या तक्रारीची महाळुंग श्रीपूर परिसरात जोरदार चर्चा सुरू होती
येथील काही सामाजिक संघटनांचे आक्रमक कार्यकर्त्यांनी सडेतोड भूमिका मांडताना सांगितले आहे की दलित महिला असलेल्या नगराध्यक्षा यांना त्यांचे घटनेने दिलेल्या अधिकारा पासुन वंचित ठेऊन त्यांना हीन वागणूक देऊन त्यांचा अपमान करणार्या संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांचेवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा या नुसार गुन्हा दाखल करावा जर गुन्हा दाखल करुन त्यांचेवर कारवाई केली नाही तर दलित संघटना यांचे वतीने आंदोलन केले जाईल
यातील या तक्रारीची चर्चा होत असताना सत्ताधारी कार्यकर्ते ज्येष्ठ यांनी सांगितले की जर खरोखर महिला नगराध्यक्षा यांना त्या दलित आहेत म्हणून जर तशी वागणूक व अपमान करत असतील तर जिल्हा अधिकारी यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी मात्र यात पक्षीय राजकारण गटबाजी करुन नाहक नगरपंचायतीची व संबंधित पदाधिकारी मुख्याधिकारी यांची बदनामी थांबवावी विद्यमान नगराध्यक्षा यां सत्ताधारी गटाकडून मोठ्या मताधिक्याने निवडुन आलेल्या आहेत
पावणे दोन वर्षांत नगरपंचायत मध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात कामकाजावर काही आक्षेप असू शकतात पण विकासात्मक कामे करताना सुरुवातीपासून सत्ताधारी व विरोधक यांच्यात कमालीचे मतभेद टोकाची भूमिका घेतल्याने अनेक कामांना खीळ बसत आहे यात दोघांना ही जबाबदार का धरु नये अशी चर्चा. नागरिकांतून सातत्याने होत आहे दलित महिला नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांचे वर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे



