महाराष्ट्र

जि. प.प्राथमिक शाळा ( संग्रामनगर)माळीनगर येथे “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” जयंती व “लोकमान्य टिळक” यांची पुण्यतिथी साजरी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ——- 97 30 867 448

(संग्रामनगर) माळीनगर ता. माळशिरस जि. सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” यांची जयंती व “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन अंगणवाडी शिक्षिका -सारिका दळवी व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा -वंदना गेजगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विनोद थोरात यांनी केले
याप्रसंगी बोलताना शिक्षक -युन्नुस तांबोळी म्हणाले की या जगात दीड दिवस शाळेत जाऊन अण्णाभाऊ साठे ,साहित्यरत्न व लोकशाहीर झाले अण्णाभाऊ साठे थोर समाज सुधारका पैकी एक समाज सुधारक होते अण्णाभाऊ साठे थोर समाज सुधारक तर होतेच त्याचबरोबर ते एक साहित्यिक, कथालेखक, कादंबरीकार, होते . त्यांनी कादंबरी, कथा व्यतिरिक्त पोवाडा, लावणी, अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले त्यांनी लिहिलेल्या कादंबरीवर काही चित्रपट ही निर्माण झाले, त्यांनी लिहलेल्या “फकीरा “या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून गौरविण्यात आले

लोकमान्य -बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना शिक्षक विनोद थोरात म्हणाले की,
लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य काळातील कार्य अजरामर आहे “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असे स्वातंत्र काळात त्यांनी इंग्रजा विरुद्ध लढ्यात म्हटले होते त्यांनी केसरी व मराठा हे दोन वर्तमानपत्र प्रकाशित करून समाजजागृती चे अनमोल कार्य केले देशातील जनतेनी त्यांना “लोकमान्य” ही पदवी दिली
या कार्यक्रमासाठी पालक , ग्रामस्थ ,अंगणवाडीशिक्षिका’
व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button