शहर

रामोशी बेरड समाजासाठी महामंडळाची घोषणा स्वागतार्ह – सुधीर नाईक

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबा. 8378076123

  • महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने रामोशी, बेरड समाजासाठी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक महामंडळाची घोषणा अर्थसंकल्पात केली. समाजाच्यावतीने त्याचे राज्यभर स्वागत केले जात आहे.

  • पिंपरी बुद्रुक येथे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक महामंडळाची घोषणा अर्थसंकल्पात झाल्यामुळे जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष सुधीर नाईक, युवा उद्योजक रामभाऊ शितोळे, प्रवक्ते रामदास खोमणे, पुणे जिल्हा शिक्षण समितीचे अध्यक्ष बापूराव जाधव सर, निरा भिमा कारखान्याचे संचालक संजय बोडके, जय मल्हार क्रांती संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष कल्याण बंडलकर, सुरेश चव्हाण, सतीश चव्हाण, दीपक चव्हाण, देविदास भंडलकर, पिंपरी बुद्रुक सोसायटीचे संचालक आप्पा भंडलकर आदिंचा सन्मान करण्यात आला.

  • युवा प्रदेशाध्यक्ष सुधीर नाईक म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात महामंडळाची घोषणा केली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो. संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या अथक प्रयत्नाने आज समाज बांधवांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समाजाच्या वतीने मी आभार मानतो.

  • ग्रामीण भागातील समाजाच्या तरूणांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी या महामंडळाचे मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे त्यामुळे समाजातील तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण भंडलकर यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पा भंडलकर यांनी केले. सुत्रसंचलन अभिजीत भंडलकर यांनी तर आभार भागवत भंडलकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button