माळीनगर येथील दफनभूमीत कचरा मानवी विष्टेमुळे होतेय विटंबना प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर

माळीनगर प्रतिनिधी… रियाज मुलाणी, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.9921500780
माळशिरस तालुक्यातील माळीनगर हद्दीतील मुस्लिम समाजबांधव यांचे अंत्यविधीसाठी दफनभूमी असुन त्याठिकाणी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दररोज त्या ठिकाणी अनेक नागरिक कचरा ,शेण टाकत आहेत. पहा हा व्हिडिओ
तसेच काही समाजकंटक खुलेआम दफनभूमी मध्ये शौचास बसत असुन त्यामुळे दफनभूमी चे पावित्र्य धोक्यात येऊन विटंबना होत असल्याने तसेच उघड्यावर शौचास बसत असल्याने अनेक महीलांची कुचंबणा होत आहे

तसेच महीलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने सदर घटनेबाबतीत समस्त मुस्लिम समाजबांधव तीव्र संताप व्यक्त करीत असुन या संतापाची लाट उसळण्याआधीच नाकर्तेपणाच्या भुमीकेस मूठमाती देऊन प्रशासनाने ठोस उपाययोजना आखुन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी माळीनगर व सवतगव्हाण येथील समस्त मुस्लिम समाजबांधव करीत आहेत .



