पंढरपुर : पुन्हा त्याच अज्ञात महिला भक्ताकडून विठुरायाला दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण, या आधीही दिले होते 1.80 कोटींचे दागिने

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू देऊ नये असं म्हणतात, मात्र सध्या द्यायचे थोडे आणि वाजवायचे जास्त अशी जगाची रीत सुरु असताना जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा पंढरपूरच्या विठुरायाला तब्बल दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. काही दिवसापूर्वी याच महिला भक्ताने देवाला जवळपास पावणे तीन किलो सोन्याचे आणि चांदीचे दागिने देवाच्या विवाहादिवशी अर्पण केले होते.
आज पुन्हा त्याच महिला भक्ताने आपल्या साधकांच्या माध्यमातून दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण केल्याने विठुरायाच्या खजिना समृद्ध झाला आहे.
एकाच भक्ताकडून दुसऱ्यांदा मंदिरास असे सव्वा कोटी रुपयांचे दान मिळत आहे. यापूर्वी जालन्याच्या याच महिला भाविकाने एक कोटी 80 लाख रुपयाचे दान दिले होते.

आजच्या मोहिनी एकादशीच्या दिवशी या महिला भाविकाने सोन्याचे धोतर, सोन्याची कंठी आणि सोन्याचा चंदनाचा हार विठ्ठल चरणी अर्पण केला आहे.
आज मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने जालना येथील या महिला भाविकाने अर्पण केले आहे.
हे दागिने आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यानंतर सदर दागिने देवाच्या चरणी अर्पण करून देवाला परिधान करण्यात आले.



