राज ठाकरे यांचे टोल माफीचे आंदोलन त्यांच्यासाठी व मनसेकरिता

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे तर्फे राज्यातील टोल माफी संदर्भात गेल्या दोन तीन वर्षांपासून आंदोलन केले आहे मात्र टोल माफ झालेला नाही मात्र राज ठाकरे हे जेव्हा राज्यातील दौऱ्यावर असतात त्यावेळी त्यांच्या गाडीला व त्यांच्या कार्यकर्त्यांना विना टोल गाड्या सोडल्या जातात राज्यातील सर्वसामान्य नागरिक इतर उद्योजक कार्यकर्ते यांना राज्यात कुठेही प्रवास केला तर त्यांच्या कडून टोल दिल्या शिवाय त्यांच्या गाड्या सोडल्या जात नाहीत
प्रश्न असा पडतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधी आंदोलन त्यांच्या पुरते केले आहे की राज्यातील सर्वसामान्य माणसांसाठी राज ठाकरे राज्यातील टोल वसुली विरोधात सहा महिन्यातून एक दोन वर्षांतून आक्रमक होतात माध्यमातून टोलविरोधी भुमिका मांडतात पुन्हा त्या नंतर अळी मिळी गुप चिळी मनसेचे कार्यकर्ते नेते यांच्या गाड्या अडवत नाहीत त्यांना सोडलं जाते
मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी टोलविरोधी आंदोलन करुन त्यांना टोलमाफी मिळऊन दिली पाहिजे तर त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले म्हणता येईल बरेचदा मराठी माणसाना न्याय मिळत नाही त्यांच्या प्रश्नांवर अस्मितेवर भाषणे केली जातात मुलाखती दिल्या जातात पण पुढे काहीच होत नाही कुठं मराठी पाट्या लावा रस्त्यांना नावे द्या सहा महिन्यातून जाहीर सभा घेउन फक्त भाषणातून इशारा सज्जड दम नक्कल केली म्हणजे मराठी माणसाना न्याय दिला असं होतं नाही मराठी एक म्हण आहे गर्जेल तो पडेल काय



