शहर

अकलूज येथे M S सर्व्हिसिंग अँड डिटेलिंग सेंटर ऑटोमॅटिक कार वॉश चे थाटामाटात उद्घाटन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे प्रथमच होत असलेल्या M S सर्व्हिसिंग अँड डिटेलिंग सेंटर ऑटोमॅटिक कार वॉश या फर्म चे उद्घाटन डॉ योगेश भीमराव खरमाटे,उपजिल्हाधिकारी (मुलुंड) यांच्या हस्ते थाटामाटात पार पडले…

या वेळी बोलताना फर्म चे ओनर समीर काझी असे म्हणाले की,अकलूज येथील सर्वच 4 व्हीलर,3 व्हीलर आणि 2 व्हीलर वाहन धारकांना अद्यावत अशा मशनरीच्या साहाय्याने त्यांच्या कार ची कामे केली जातील,या कामासाठी अगोदर अकलूज येथील कार चालकांना बाहेर गावी जाऊन सर्व्हिस करावी लागत होती परंतु माळीनगर रोड वरील अकलाई कॉर्नर,H P पेट्रोल पंप समोर आपले फर्म सुरु केल्याने कार चालकांची सोय झाली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले…

या वेळी उद्घाटन प्रसंगी मुस्लिम रिती रिवाजा प्रमाणे फातेहा खानी कऱण्यात आले,तद नंतर फर्म चे ओनर समीर काझी यांचे दाजी माजी सैनिक अमन पिरजादे यांचे घनिष्ठ मित्र आणि दिल्ली येथील युवा उद्योजक गणी पिरजादे यांच्या मार्गदर्शना खाली डॉ योगेश भीमराव खरमाटे,उपजिल्हा अधिकारी,(मुलुंड) यांच्या हस्ते फीत कापण्यात आली…

या प्रसंगी ॲड वजीर शेख,दुकानाचे ओनर समीरभाई काझी,पत्रकार मोहसीन शेख,पंचवटी येथील उद्योग पती शरीफभाई पठाण,पंचवटी येथील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस “तय्यब भाई”,पप्पू शेख,वसीम पटेल,इस्माईल शेख,अलीम काझी,इमरान मुलाणी,आयान तांबोळी,अमन काझी,सद्दाम काझी,शाहरुख काझी,शाहरुख मिस्त्री,नाजीर मोहोळकर,टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी यांच्यासह काझी गल्ली येथील “काझी मोहल्ला” यंग ग्रुप चे सर्व सदस्य बहु संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button