अकलूजच्या गणेशोत्सवा मध्ये यंदाच्या वर्षी भावी आमदार शिवबाबा यांची क्रेझ…
⛔ हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे वंदे मातरम् गणेश उत्सव मंडळ…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज :- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल अकलूज शहर,सण,सोहळे,सामाजिक कामे आदर्श पद्धतीने पार पाडणारे गाव म्हणून सबंध जिल्ह्यात ओळख…
आपल्या सर्वांना आठवत असेल की गेल्या वर्षी गणेश उत्सवाच्या काळात धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील हे युवा नेतृत्व “खासदार” व्हावे म्हणून एक ट्रेण्ड चालला तो अकलूज च्या गणेशनगर येथील वंदे मातरम् गणेश उत्सवाच्या माध्यमातून…
यंदाच्या वर्षी हि “वंदे मातरम्” गणेश उत्सव मंडळ “युवा नेते” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची माढा विधानसभा मतदार संघातून “भावी आमदार” म्हणून क्रेझ कायम करत आहेत,युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे अकलूज येथील सर्व सामाजिक क्षेत्रातील संस्थांना नेहमीच मार्गदर्शन असते…
अकलूज येथील “वंदे मातरम्” गणेश उत्सव मंडळ म्हणजे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिकच,या मंडळाच्या आरती चा मान “एव्हरेस्ट वीर” स्व निहाल बागवान याच्या आई वडिलांना हि दिला जातो तसे तो स म शं मोहिते पाटील कृषि उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी अ गणी पठाण यांना सुध्दा दिला जातो…
तसेच यंदाच्या वर्षी अकलूज येथील जुना बाजार तळ,नागोबाचा कट्टा येथील नागराज गणेश उत्सव मंडळाने 21 फुटी नारळाची गणेश मुर्ती साकारून सर्वांच्या लक्ष आकर्षित केले आहे…