पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव प्रशालेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रावगाव : ५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून ९ सप्टेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव या प्रशालेमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी परिपाठ झाल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात वर्ग सातवीच्या विद्यार्थीनीनी गायिलेल्या सुमधूर स्वागत गीतांनी झाली. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय कोळेकर सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री किरण परदेशी सर, बाबासाहेब सरडे सर, प्रताप बरडे सर, हनुमंत रासकर सर, अंजली लांडगे मॅडम, आणि सुहास कानगुडे सर यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय कोळेकर सर हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन व कार्याचा परिचय करून दिला. त्यांच्या काही आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली यानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिना निम्मित आपआपली भाषणे सादर केली.
अतिशय उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला, या सर्व कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते.