छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली येथील गणेश उत्सवाची ७७ व्या वर्षी देखील जल्लोषात प्रतिष्ठापणा.गणेशोत्सवासह वर्षभर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे मंडळ
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ 77 व्या वर्षी देखील जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शहरातून गणपती मूर्ती ची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बँजोवर मंडळातील कार्यकर्त्यांनी लेझीम पथक आणि मंडळातील चिमुकल्यांनी दांडिया एकसारखे गणवेशात साजरा करण्यात आला. यावेळी लेझीम पथक व दांडिया आकर्षित ठरले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाची स्थापना सन 1947 रोजी स्व. अनंतराव ( आबा ) सावंत यांनी स्व. हुसेन अंडेवाले, स्व. दौला कसाब, स्व. गोपाळराव सामसे, स्व. बाबा मोरे, स्व. रंगनाथ बनकर, स्व. मुकुटराम सुरवसे, स्व. साताप्पा मोरे, स्व. कृष्णाजी वीर, स्व. पोपट काकडे, स्व. हाशम शेख , स्व. कोंडीबा मुसळे, स्व. मोहन किरवे, स्व. दशरथ साळुंखे, स्व. इसाक दाळवाले, अशा अनेक विविध समाजातील अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्व. आबा सावंत यांनी या मंडळाची स्थापना केली होती. आता या मंडळाला 77 वर्षे पूर्ण झाली आहे.
स्व. आबा सावंत यांच्यानंतर मंडळाची धुरा कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा ) सावंत यांच्याकडे आली. त्यांच्या अकाली निधनानंतर आता या मंडळाची धुरा पै. सुनील बापू सावंत, ॲड. राहुल सावंत , संजय ( पप्पू ) सावंत यांच्याकडे आली असून ते मंडळासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे. दरवर्षी हे मंडळ सामाजिक सलोखा राखत सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता जपत श्री गणेश मंडळाचा देखावा सादर करत असून मंडळाची श्री ची मिरवणूक ही शांततेत पार पाडत असून मंडळा मध्ये दरवर्षी होतकरू व सर्व समाज समावेश अशा पदाधिकारी ची निवड करण्यात येते. यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न कसोशीने करण्यात येतो.
करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य म्हणून या मंडळाकडे पाहिले जाते. मंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम वर्षभर राबविले जाते. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर, हनुमान जयंती , हरिनाम सप्ताह, भव्य कुस्ती मैदान, मूकबधिर शाळा व काॅटेज हाॅस्पिटल येथे खाऊ वाटप व फळे वाटप, गोशाळा येथे जनावरांना हिरवा चारा वाटप, आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांना चिवडा वाटप असे कार्यक्रम घेण्यात येतात . त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषाची मंडळाच्या वतीने जयंती साजरी केली जाते.
तसेच मुस्लिम समाजाच्या रमजान महिन्यात रोजा ईप्तार पार्टीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते तसेच मुस्लिम समाजातील हाज यात्रेसाठी सौदी अरेबिया येथे जाणारे भाविकांचा सन्मान करण्यात येतो त्याचप्रमाणे मंडळातील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते कडून विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मूर्तीवर जामा मस्जिद वरून पुष्पवष्टी करण्यात येते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळच्या वतीने वर्षभर कार्यक्रम राबवले जातात यासाठी मंडळातील असंख्य कार्यकर्ते प्रामाणिक पणाने व एकजूटीने मंडळासाठी अहोरात्र झटतात त्यामुळेच हे मंडळ 77 वर्षापासून एकत्रित आहे.
तसेच दरवर्षी मंडळातर्फे हालता देखावा दाखविला जातो. यावर्षी ” वड सावित्रीची पूजा ” हा हालता देखावा साजरा करण्यात येणार आहे.