मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते करमाळ्यात भांडी वाटपाचा कार्यक्रम!!!
करमाळा (प्रतिनिधी ) अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळ्यातील नोंदणी कृत बांधकाम 567 कामगारांना प्रत्येकी दहा हजार आठशे रुपये किमतीचे एक कोटी रुपयांची भांडी वाटपाचा कार्यक्रम सोमवारी 9 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता देवीचा माळ रोडवरील शिवसेनेचे मुख्य कार्यालयात होणार असून या कार्यक्रमाला बहुसंख्य शिवसेनेच्या पदाधिकारी उपस्थित रहावे असे आव्हान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी केले आहे यावेळी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडके बहीण योजनेची माहिती स्नेह मेळावा आयोजित केला असून स्नेहभोजनाचे हे आयोजन केले आहे
करमाळा तालुक्यातील रुग्णांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आत्तापर्यंत दोन कोटी 17 लाख रुपयाचा आरोग्य उपचारासाठी निधी मिळाला आहे अशांच्या वतीने मंगेश चिवटे यांचा सत्कार मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित तात्या बागल जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष एडवोकेट कमलाकर वीर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे