पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हरेश ठाकरे यांनी लाचेची मागणी केल्या प्रकरणी पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी केला गुन्हा दाखल
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
बोईसर येथील (27) वर्षीय तक्रारदार त्यांच्या विरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या बोईसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हरेश ठाकरे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्या पथकाने सोमवारी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाणे येथे ((27) वर्षीय पुरुष तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
या गुन्ह्यात या तक्रारदाराला अटक न करण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हरेश ठाकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 13 ऑगस्ट 2024 रोजी 20 हजार रुपयांची मागणी केली होती.हे पैसे घेण्यासाठी हा पोलीस नाईक त्यांना वारंवार पैशाची मागणी करत होता. या पोलीस नाईकाच्या या तगाद्याला वैतागून तक्रारदार यांनी या पोलीस नाईका विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
याबाबत सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र, व गजानन राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी पडताळणी करून बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हरेश ठाकरे यांच्या विरुद्ध सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.