शहर

सफाळे भागातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा.. पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचे पोलीस पाटलांसह नागरिकांना आवाहन.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

आगामी सण उत्सव व निवडणुका या अनुषंगाने सफाळे भागात शांतता अबाधित रहावी या निमित्ताने बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या अध्यक्षतेखाली सफाळे पोलीस ठाण्यात सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील 22 गावांच्या पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला संदेश पाटील- लालठाणे, केतन पाटील- गिराळे,राजेश पाटील- विठ्ठलवाडी-मांडे, सौ.वैभवी शेलार-वेढी, निलेश म्हात्रे- मांजुर्ली, निलेश पाटील -सफाळे, किशोर पाटील – नावझे, सुजित पाटील-तांदुळवाडी, सौ.प्रीती पाटील – पारगाव, शरद सातवी- खडकोली या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

या सर्व उपस्थित पोलीस पाटील यांना आगामी गणेश उत्सव, गोपाळकाला, ईद-ए-मिलाद, दीपावली व ग्रामपंचायत तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेने पार पाडाव्या व कायदा सुव्यवस्थेचे पालन करून आपापल्या भागात शांतता कायम राखण्यासाठी सर्व पोलीस पाटील यांना त्यांच्या कामाची जाण व आपली जबाबदारी व आपले कर्तव्य याबद्दल सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच सफाळे भागात वाढते नागरिकरण व परप्रांतीयांचे वास्तव्य यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे सफाळे भागात नवनवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये भाडे तत्वावर राहण्यासाठी आलेल्या नागरिकांची योग्य विचारपूस व चौकशी करून त्यांची योग्य ती छायाचित्रासह कागदपत्रे जमा करून त्याची नोंद करून याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात घर मालक व इमारतीच्या मालकांनी माहिती देणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती सफाळे पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन सफाळे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी या बैठकीत सर्व पोलीस पाटील यांना दिली व सफाळे भागातील सर्व नागरिकांना सफाळे भागात शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button