जो व्यसनमुक्त आहे तोच खरा शिवभक्त— सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
“जो व्यसनमुक्त आहे तोच खरा शिवभक्त “आहे असे उदगार प्रसिध्द लेखक ,कवी, आणि व्याख्याते ,चंद्रशेखर गायकवाड ‘यांनी शिवचरिञावर शिवप्रतिष्ठान (मोरे वस्ती )फळवणी येथे आयोजित शिवजयंती निमित्त व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर तर प्रमुख पाहुणे म्हणून युवराज अवताडे पोपट आवताडे जगन्नाथ वाघमारे समाधान मोरे राहुल अवताडे कृष्णा मोरे शिवाजी बागल आधी उपस्थित होते

प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना चंद्रशेखर गायकवाड म्हणाले की शिवप्रतिष्ठान मधील सर्व शिवप्रेमी युवक व्यसनमुक्त आहेत याचा मला अभिमान आहे कारण कारण जो व्यसनमुक्त आहे तोच खरा शिवभक्त असून महापुरुषांची जयंती दोन दारूपासून मुक्त असावी एक उडवायची दारू आणि दुसरी पिण्याची दारू शिवप्रतिष्ठांनी समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे तो कौतुकास्पद असून. नाचून मोठे होण्यापेक्षा वाचन करून मोठे व्हा डॉल्बीमुक्त शिवजयंती काळाची गरज असून पारंपारिक कलावादकांना उत्तेजन देऊन शिवजयंती साजरी करत आहेत त्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे अभिनंदन करून पुढे म्हणाले की आता किल्ले नव्हे तर जिल्हे जिंकायचे दिवस आलेले आहेत या युवाशक्तीतून चांगले अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार उद्योजक प्रगतशील पूरक शेती उद्योजक भविष्यकाळात निश्चित निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला
तसेच राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी कोरोना काळात हजारो जनतेला अन्नधान्याची मदत केली हेच खरे शिव कार्य असून ही कौतुकास्पद बाब आहे तसेच मोरे वस्ती वरील शिवप्रतिष्ठांनी गेली सात वर्ष शिवजयंतीनिमित्त प्रबोधनात्मक आणि मुलांच्या कलागुणांना वाव प्रेरणा देणारा कार्यक्रम आयोजित करत आहेत लहान मुलांना शिवचरित्रावर भाषणाची तयारी उत्तम प्रकारे करून घेतली याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला

तसेच शिवप्रतिष्ठांनच्या वतीने शिवभोजन देऊन एकमेकातील स्नेह व संघटित पणा वाढीस लावण्याचे कार्य करत आहे याप्रसंगी फळवणी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पांडुरंग मोरे व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले



