महाराष्ट्र
मुंबई येथील आझाद मैदानावरील मातंग समाजाच्या आंदोलनास सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पाठिंबा

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
मुंबई येथील आझाद मैदानावर सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने” जवाबदो आंदोलनास” सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे

राज्यातील सकल मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे 1) मातंग समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ,बं, क ,ड ,आरक्षण वर्गीकरण करावे 2) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण स्वतंत्र केंद्राची स्थापना करावी या प्रमुख मागण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या बांधवांचे मुंबई येथील आझाद मैदानावर “जवाबदो आंदोलन” चालू आहे.



