शहर

वाणगाव चिंचणी कलोली येथील किरण संखे यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन पाण्यात बुडून मृत्यू.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

पावसाच्या पुराच्या पाण्यातून गाडी चालवल्यामुळे या गाडीतील एकाचा या पाण्यात वाहून जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या गाडीतील दोन जणांना या गावातील ग्रामस्थांना वाचवण्यात यश आले आहे.
ही घटना पालघर जिल्ह्यातील वाणगाव चिंचणी महामार्गावरी कलोली येथे गुरुवारी पहाटे घडली आहे.

बाबा जोशी, गणेश संखे आणि किरण संखे हे तिघेजण गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी पहाटेच्या वेळी आपल्या कारणे वाणगाव चिंचणी रस्त्याच्या मार्गावरून कलोली येथे जात होते. यावेळी कलोली रस्त्यावर पावसाच्या पुराचे पाणी जोरात वाहत असल्यामुळे त्यांची गाडी या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन गाडीचा दरवाजा उघडल्यामुळे गाडीतील किरण चिंतामण संखे वय वर्ष (51)यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला आहे. तर बाबा जोशी व गणेश संखे यांना वाचवण्यात येथील ग्रामस्थांना यश आले आहे.

यावेळी कलोली येथे या पावसाच्या पुराच्या पाण्यातून अनेक जण रस्ता पार करत असताना गावकऱ्यांनी व वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उतरून वाहतूकदारांना मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button