उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसा निमित्त डहाणू येथे माजी गृहमंत्री कृपाशंकरजी सिंह यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त शनिवार दिनांक 22 जुलै रोजी दशाश्री माळी समाज सभागृह मसोली डहाणू येथे दुपारी 1:30 वाजता सेवादिन व सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी भाजपचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री श्री. कृपाशंकरजी सिंह ह्यांच्या शुभ हस्ते गरजू महिलांना शिलाई मशीन तसेच गरजू लोकांसाठी अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम डहाणू माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नवनिर्वाचित पालघर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष .श्री. भरतभाई राजपूत ह्यांचा अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री.भरतभाई राजपूत यांचा डहाणू शहर मंडळातर्फे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत



