“राजकीय छिनालांच्या तावडीत लोकशाही”— ज्ञानेश वाकुडकर

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . —97 30 867 448
गुंडागर्दी आणि अवैध संपत्तीतून निर्माण झालेली अनैतिक पैदास म्हणजे अलीकडच्या काळातील आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद आणि सत्ता! त्याला काही अपवाद असतीलही.. पण ही नवी छिनाल संस्कृती आता राजकारणात सर्वमान्य झालेली आहे. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. किंवा ह्या घटना तशा अपवादात्मक देखील राहील्या नाहीत. कालपर्यंत ज्यांच्या नावाने भ्रष्टाचाराचे आरोप केले, ऊर बडवून, बांगड्या फोडून गळे काढले, त्याच जनावराच्या सोबत संसार करायला नेत्यांना जराही लाज वाटत नाही. ही नवी राजकीय संस्कृती ’कोठ्या’ तून निघून चौकात राजरोस धंदा करायला बसलीय. त्यातुनच यांची करोडो, अब्जावधी रुपयांची कार्पोरेट कार्यालये उभी राहिलीत. २०१४, नंतर तर ह्याला देशात उधाण आलं आहे.
कर्नाटकातील सरकार पाडलं. मध्यप्रदेशातील सरकार पाडलं. बिहार मध्ये पासवान यांच्या पक्षाचे ६, पैकी ५, खासदार फुटले, एम आय एम पक्षाचे ५, पैकी ४, आमदार फुटलेत. महाराष्ट्रात तर अगदी निर्लज्जपणाचा कळस झाला. न्यायालये, राज्यपाल यांनी देखिल साऱ्या मर्यादा तोडल्या. कुणालाही लाज वाटत नाही. पक्ष कोणताही असू द्या किंवा अपक्ष असू द्या. सत्ता आणि पैसा फेकल्यास ते काहीही करायला तयार आहेत. उत्तर प्रदेशात स्थानीय स्वराज्य संस्थेत भाजपाचा सफाया झाला होता. तरीही अध्यक्षपदी मात्र भाजपचे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात निवडून आले, याचा नेमका अर्थ काय? गुंडागर्दी, पैसा या व्यतिरिक्त दुसरे कोणते कारण असू शकते? महाराष्ट्राच्या बाबतीत देखील संतापजनक बाब अशी, की विश्वास दर्शक ठराव मांडण्याची वेळ असताना काँग्रेसचे चक्क ११, आमदार गैरहजर होते? यांना कुणी अफू चारली होती की गांजा? की आणखी काही वेगळा व्यवहार झाला होता? धक्कादायक बाब म्हणजे यात माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री देखील सामिल होते!

कसल्या विकाऊ लोकांच्या हातात आपली लोकशाही गेली आहे बघा. ही किड साऱ्याच पक्षांना आणि साऱ्याच जाती धर्माच्या लोकांना लागली आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, यांच्या हिस्से, वाटण्या ठरलेल्याच असतात. त्यांचे मीटर सुरुच असते. त्यांचं फारसं काही बिघडत नाही.
हा राजकीय छिनालपणा आपण असाच चालू देणार आहोत का? उद्या देशाचे तुकडे झाले तरी ह्या लोकांना काहीही सोयर सूतक नाही! त्यातही आपलं आपलं कमिशन घेऊन हे लोक चूप बसतील! आता विचार तुंम्हा, आंम्हाला करायचा आहे! विचार जनतेला करायचा आहे!
मी कुणाला काय बोलू,
या उन्हाला काय बोलू,
बाग जर बैमान झाली..
कुंपणाला काय बोलू?
पुढच्या पिढ्यांचं भवितव्य बर्बाद होऊ नये असं वाटत असेल, देश आणि लोकशाही सुरक्षित राहावी असं वाटत असेल, तर या राजकीय छिनालपणाच्या विरुद्ध मोठा लढा उभारावा लागेल. युवकांना पुढं यावं लागेल! त्याशिवाय पर्याय नाही! बघा.. विचार करा!
तूर्तास एवढंच..!
©️ ज्ञानेश वाकुडकर.
अध्यक्ष.
लोकजागर.
9822278988
•••



