महाराष्ट्र
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या( अजित पवार गट ) जिल्हाध्यक्षपदी महेंद्र काका धुरगुडे यांची निवड.

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .—-97 30 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार गट) उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी मंगरूळ येथील महेंद्र काका धुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात नियुक्तीपत्र देऊन जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी आमदार विक्रम काळे व प्रा. सुरेश बिराजदार आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
धुरगुडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असुन त्यांनी जिल्हा परिषदेत अनेक विषय आक्रमक व अभ्यासपुर्ण मार्गी लावले आहेत. ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.



