शहर

“तस्मिया” आणि “अदील साहब” यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न…

चौधरी – बागवान परिवाराच्या विवाह सोहळ्यास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सह आमदार उत्तमराव जानकर यांनी लावली हजेरी…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

अकलूज चे प्रसिद्ध उद्योगपती हाजी जहांगीर शेठ बागवान चौधरी यांची नात आणि हाजी जमीरभाई बागवान चौधरी यांची सुकन्या “तस्मिया” आणि पुणे येथील प्रसिद्ध स्क्रॅप उद्योजक असलेले हाजी युनूसभाई बागवान यांचे चिरंजीव “अदील” उर्फ निहाल यांचा विवाह सोहळा अकलूज येथील “कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हॉल” येथे रविवार दि. 19/01/2025 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला…

या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या सर्व आप्तेष्टांचे चौधरी बागवान परिवारा तर्फे शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले…

काल संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्या प्रसंगी वधु वरांना शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद देण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या सह पुणे येथील बागवान समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष जावेदभाई बागवान यांनी उपस्थिती दर्शविली…

तसेच या विवाह सोहळ्यासाठी सोलापूर येथील शाहीन फाऊंडेशन चे उमरभाई M राऊंड,राजा भाई,जावेदभाई (KD),अशपाक मेंबर,सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्टचे इक्बालभाई दलाल,रईसभाई नाफे,मुबिनभाई कल्ल्याणी,समाजसेवक शाहनवाज कंपली यांनी देखील या विवाह सोहळ्यासाठी आवर्जुन हजेरी लावली…

अकलूज शहर बागवान जमातीच्या सदस्यासह व्यापारी,मित्र,पत्रकार मंडळी,तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत चे सर्व माजी सदस्य यांच्या सह सांगली,वाळवा,सोलापूर,पुणे,इंदापूर,सातारा,कुर्डूवाडी,वाई,पंढरपूर येथील पाहुणे रावळे मोठ्या प्रमाणात हजर होती…

सदरच्या विवाह सोहळ्याचे “परफेक्ट” नियोजन हाजी जमीरभाई बागवान चौधरी आणि साबीरभाई बागवान चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सर्व बंधूंनी केले…

कायम स्मरणात राहील असा “माशअल्लाह” विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झाल्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाने चौधरी – बागवान परिवार यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button