महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीची अकलूज येथे बैठक संपन्न…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीची बैठक अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या वेळी बैठकीला संबोधित करताना वर्किंग कमिटी चे जिल्हा संघटक हाजी मुश्ताकभाई बागवान (मोहोळ) यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक विषयाची माहिती दिली…
या वेळी बागवान समाजातील आर्थिक दुर्बल घटकाला शासनाच्या सवलती,OBC चे दाखले,उत्पन्न दाखले,नॉन क्रिमिलर दाखले यावर चर्चा करण्यात आली…

तसेच ज्या घरात कर्ता पुरुष नाही तेथील महिलांना शासकीय कार्यालयात काही कागद पत्रे काढण्यासाठी त्रास होत असेल त्या सर्व महिलांनी बागवान वर्किंग कमिटी कडे विचारना करुन मदत घेण्याचा निर्णय देण्यात आला…
या वेळी संस्थापक अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहन्याचा निर्णय हि घेण्यात आला तसेच त्यांच्याच आदेशाने नातेपुते शहर अध्यक्षपदी मोहसिन हाजी अ रज्जाक बागवान आणि माळशिरस ता. प्रसिद्ध प्रमुख पदी शोएब अ गनी बागवान (अकलूज ) यांची निवड जाहीर करण्यात आली…

सदरच्या बैठकीत “बागवान समाज भूषण” चे माजी भैया माढ़ेकर यांची उपस्थिती उल्लेखनीय होती,या वेळी वर्किंग कमिटी चे कार्याध्यक्ष हसन माढ़ेकर,साबिर बागवान,शोएब बागवान,इमरान जब्बार बागवान नातेपुते चे हाजी अक्रमभाई बागबान उपस्थित होते…
वर्किंग कमिटी चे शहर अध्यक्ष काही कारणास्तव उपस्थित राहू न शकल्याने मोहसिन बागवान यांनी दिलगिरी व्यक्त केली,या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन तालुका अध्यक्ष मुख्तार युनुस बागवान यानी केले,तालुका उपाध्यक्ष फरीद मोहम्मद मोहोलकर यानी आभार व्यक्त केले…
टीप :- बागवान वर्किंग कमिटीची पुढ़िल बैठक नातेपूते येथे होईल असे जाहीर करण्यात आले…