महाराष्ट्र

उदयोन्मुख नेता ते प्रगल्भ नेतृत्व म्हणजे शिवतेजसिंह मोहिते पाटील…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील परिवारातील एक उदयोन्मुख तरुण अकलूज ग्रामपंचायती वर भरघोस मतांनी निवडून येत साधारण पणे 14 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली होती,त्या उदयोन्मुख तरुणाचे नाव होते शिवतेजसिंह मोहिते पाटील…

अकलूज ग्रामपंचायती वर सलग पाच वर्षे सरपंच असलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी विकास कामाचा नुसता धडाका लावलेला होता हे सबंध अकलूज करांनी याची देही याची डोळा पाहिले…

त्या पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज चा चेहराच बदलून टाकला,रस्ते,गटारी, अकलूजच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असणारे नाले पावसाळ्यात तुंबुन जायचे आणि याची झळ नाल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना होत असे,शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या दोन्ही नाल्याची साफ सफाई आणि रुंदीकरण केल्याने तेथील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला हे मात्र तितकेच खरे…

अकलूज आणि परिसराचा “विकास” हाच एकमेव उदात्त हेतू,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पश्चात “विकासरत्न” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने,आमदार रणजीतसिंह मोहीते पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी आणि “जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली युवक सम्राट शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे येणाऱ्या किती तरी वर्षांचा अकलूजच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला…

2020 मध्ये अकलूज ग्रामपंचायतची पंच वार्षिक निवडणुक जाहीर झाली अन् त्या निवडणुकीत देखील सलग दुसऱ्या वेळेस वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडून आलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीचा ट्रॅक बदलण्याचे प्रयत्न सुरु केले,सलग 43 दिवस उपोषण करुन अकलूज नगर परिषदेचा केलेला ठराव केवळ आणि केवळ शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याच पाठ पुराव्या मुळे मंजूर होऊ शकला,ती तारीख होती 03/08/2021…

तत्कालीन भाजपा सरकार कडून अकलूजसाठी अमृत २ योजनेतून सुमारे २१२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ११९.१४ कोटीं,अंडर ग्राउंड गटारी साठी 121 कोटींच्या तसेच विविध विकास कामासाठी 70 कोटींच्या निधीला मंजुरी मिळवत युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केलेला पाठ पुरावा सफल ठरल्याने अकलूज आणि परिसरातील तमाम जनतेने त्यांचे अभिनंदन केले…

तद्नंतर सबंध भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते,माढा लोकसभा मतदार संघाची झालेली वाताहत आणि तत्कालिन खासदारांच्यां विरोधात उठलेले वावटळ थांबता थांबेना असे झालेले असताना ऐन उन्हाळ्यात आलेली लोकसभा निवडणुक आणि उन्हा बरोबर तापलेले राजकिय वातावरण मौसमी वारे वाहून देखील शांत व्हायला पाहिजे होते पण तसे न होता ते आणखी तापून सुलाखून निघत होते…

2024 लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातुन अपेक्षे प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची “तुतारी” धैर्यशिल मोहिते पाटील यांनी वाजवत लोकसभेत प्रवेश केला आणि सोलापूर जिल्ह्यात राजकारणाचे एक नवीन समीकरण तयार झालेले पहायला मिळाले…

लोकसभा निवडणुकीत देखील माढा तालुक्याची एक हाती जबाबदारी एकट्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पेलून दाखवत माढा तालुक्याच्या गेल्या तीस वर्षांपासुन च्या राजकीय ताकतीला शह देउन गेली अन् येथूनच सुरू झाला एका प्रगल्भ नेतृत्वाचा नवीन राजकीय अध्याय ज्याला माढा लोकसभा मतदार संघातील जनता “शिवपर्व” या नावाने ओळखू लागली…

“अजातशत्रु” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी कुर्डुवाडी येथे सर्व रोग निदान शिबिराच्या प्रसंगी जि प चे माजी सदस्य आनंद कानडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भविष्यात माढा विधानसभा जिंकुन विकासाच पॅटर्न राबवायचा असेल तर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना माढा तालुक्याची विधानसभा लढवावीच लागेल असे म्हणत एकच खळबळ उडवून दिलेली असताना शरद पवार साहेब,विजयसिंह मोहिते पाटील,जयंत पाटील साहेब यांच्या शब्दाखातर माढा विधानसभेतून माघार घेत पंढरपूरच्या “विठ्ठल” चे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या विजया साठी अहोरात्र प्रयत्न केले…

कानडे यांनी बोलून दाखवलेली भावना रास्त होती कारण गेल्या तीस वर्षांपासून माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास रखडलेला होता हे लपून राहिलेले नव्हते त्यामुळेच विकासाच मोहिते पाटील पॅटर्न राबवायचा असेल तर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्या उमद्या तरुणाच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील जनतेने एकत्र येणे गरजेचं आहे असे वक्तव्य कानडे यांनी त्या वेळेस केले होते…

माढा तालुक्याच्या आमदार पदी अभिजीत पाटील हे निवडून आले नंतर त्यांच्या एका विजयी सभे मध्ये माढा तालुक्यातील एक महिला पदाधिकारी असणाऱ्या ज्योतीताई कुलकर्णी यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा उल्लेख किंग मेकर असा केला होता हे तुम्हा आम्हाला विसरून चालणार नाही…असो…

विधानसभा निवडणुकीच्या काऊंटिंग नंतर राजकिय अज्ञात वासात गेलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज सह माळशिरस तालुक्यात हि लक्ष घालावे अशी तमाम जनतेची मागणी पुढे येत आहे,त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हि महत्वाच्या ठरणार आहेत,माढा आणि करमाळा तालुक्यातील गेल्या तीस वर्षाची “शिंदे शाही” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या परीने कशी मोडीत काढली हे सबंध महाराष्ट्राने पाहिले आहेच…

नव वर्षाच्या सुरुवातीस येणाऱ्या मकर संक्रांत या सणासाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत सौ देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना सबंध अकलूज करांनी काय साद घातली आहे,हे पाहण्याची गरज आहे आणि खरंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सारखे चौफेर नेतृत्व हे काळाची गरज आहे हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button