महाराष्ट्र

अकलूज च्या मुस्लिम समाजाच्या चळवळीतील भैय्या माढेकर यांची बागवान वर्किंग कमिटीच्या जिल्हा “उपाध्यक्ष” पदी निवड…

🎯 अकलूजच्या भावी नगरसेवकाची आणखी एक उत्तुंग झेप…

आमीर मोहोळकर
अकलूज शहर प्रतिनिधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क 9890299499

भैय्या माढेकर म्हणुन च अकलूज च्या जनमानसात ओळख असणारे अकलूज चे शकुर महम्मद बागवान यांची आज महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी च्या सोलापूर जिल्हा “उपाध्यक्ष” पदी निवड झाले बद्दल भैया माढेकर यांना खूप खूप शुभेच्छा…

महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी चे प्रमुख डॉ शरीफ बागवान आणि हाजी मुश्ताक बागवान (मोहोळ) यांच्या आदेशाने भैय्या माढेकर याची झालेली निवड भविष्यात ते सार्थ ठरवतील हे मात्र तितकेच खरे…

अकलूज च्या मुस्लिम चळवळी तील एक अग्रगण्य नाव,सोलापूर जिल्ह्यातून अनेक राजकीय कार्यकर्ते घडले ते अकलूज च्या मोहिते पाटील यांच्या नेतृत्वामुळे,त्या पैकी एक म्हणजे भैय्या माढेकर…

अल्पावधीत आपल्या अंगी असणारी कार्यकर्त्याची चुणूक भैय्या माढेकर यांनी दाखवली,त्यामुळेच अकलूज शहर बागवान समाजाचे अध्यक्ष म्हणुन काम पाहत असताना अकलूज मध्ये सर्वात प्रथम बागवान समाजाचा भव्य असा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करुन सबंध सोलापूर जिल्ह्यातील बागवान समाजा कडून वाहवा मिळविली…

राजकिय आणि सामाजिक कार्य करीत असताना पदे येतात जातात परंतु कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आपली समाज सेवा अखंडपणे सुरु ठेवणारा एक “अजातशत्रू अवलिया” म्हणजे भैय्या माढेकर…

मुस्लिम समाज आणि अनावधानाने बागवान समाजातील प्रत्येक प्रश्न सोडविण्या संदर्भात भैय्या माढेकर यांनी कधी हि आणि कसलीही तडजोड केली नाही हे विशेष आणि या मुळेच येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची भैय्या माढेकर यांना संधी मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…

अकलूज येथील सामाजिक चळवळीत उल्लेखनीय काम करणाऱ्या “ताहेरा फाऊंडेशन” या संस्थे मार्फत भैय्या माढेकर यांचा नुकताच “समाज भुषण” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता…

एक मित्र म्हणुन हि मोठा माणूस असणारा भैय्या माढेकर यांच्या जीवनात किती तरी कठीण प्रसंग आले तरी हि न डगमगता आलेल्या आव्हानाला परतावून लावणारे आणि अकलूज च्या मुस्लिम चळवळीतील माझे मित्र भैय्या माढेकर यांना या पदाच्या मनापासून शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button