महाराष्ट्र

दसुर येथे दोघांवरती बिबट्याचा प्राण घातक हल्ला वाहनाच्या दडकेने बिबट्याचा मृत्यू

प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो.9921500780

माळशिरस तालुक्यातील दसुरपाटी येथे सायंकाळी 7.30 सुमारास एका वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याने 2 जणांवर हल्ला केला. जखमींवर बोंडले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींची नावे चंद्रसेन रामचंद्र रणवरे, समाधान खपाले,दोघे राहणार दसुरपाटी, तालुका माळशिरस येथील रहिवासी आहेत.

पालखी महामार्गावरील टण्याचा उड्डाणपूल ओलांडल्यानंतर दसुर गावच्या हद्दीत उड्डाणपुलाजवळ एक वाहन चालले होते. त्या वाहनाने बिबट्याला धडक दिली. वाहनाने कशाला धडक दिली हे पाहण्यासाठी चंद्रसेन रणवरे व समाधान खपाले तेथे गेले असता, धडकेने उडून पडलेल्या बिबट्याने चंद्रसेन रणवरे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाची पिंडरी जबड्यात धरली.चंद्रसेन यांनी बिबट्याचा जबडा धरला, तर समाधानने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला प्रत्यक्षदर्शी महेश कापसे यांच्या माहितीनुसार, तीन बिबटे होते.त्यापैकी एकाला धडक बसली, तर 2 पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे व पोलीस फौजफाटा दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे पोलिसांना जमाव नियंत्रण करणे कठीण झाले.

यानंतर माळशिरस वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र आटोळे, वनरक्षक प्रभावती कोंबडे, वनपाल अशोक लोखंडे, वनरक्षक तांबे, वनरक्षक गीते, वनरक्षक गुंड व इतर कर्मचारी दाखल झाले. बिबट्याला शवविच्छेदनासाठी पुणे येथे नेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button