भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत ताटे- देशमुख यांच्या सहकार्याने वाड्या वस्त्यावर जाऊन फार्मर आयडी काढण्याचे काम सुरू

प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो 9921500780
शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध कृषि विषयक अर्थ सहाय्य/अनुदान मिळणेकामी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक(फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे.परंतु ऑनलाइन फॉर्म भरतेवेळी दिवसभर नेटवर्क आणि सर्वर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या.यासाठी संगम येथील माळशिरस तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत ताटे-देशमुख यांच्या सहकार्याने वाड्या-वस्त्यावर जाऊन फार्मर आयडी काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी प्रशांत ताटे-देशमुख बोलताना म्हणाले की, उन्हाळ्याची चाहूल लागत आहे.दिवसा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे शेतकऱ्यांचा दिवस वाया जात आहे.त्यामुळे संध्याकाळी शेतकरीही निवांत असतात व नेटवर्कही असते त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर जाऊन शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.त्याच्या या कार्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.