महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील मनसेचे केळवे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालघर विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत केळवे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश सालकर आणि महिला तालुका उपाध्यक्षा जाई किणी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला.

पालघर राजयोग येथील जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या प्रवेशावेळी उपनेते ज्योती मेहेर, सहसंपर्कप्रमुख तथा प्रवक्ते केदार काळे, जिल्हा महिला संघटिका वैदेही वाढाण, पालघर विधानसभा संघटक समीर मोरे, उपजिल्हासंघटक दिनेश गवई,,राहुल घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याची किमया शिवसेना या चार अक्षरात आहे असे सांगून कुंदन संखे म्हणाले, तसेच नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे विकासकामे करण्याची ताकद आहे. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने इतर पक्षांतील कार्यकर्ते नेते आज एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करीत आहेत असेही जिल्हाप्रमुख कुंदन संखे यावेळी म्हणाले.

केळवे येथे मनसेची सत्ता आहे.आणि सरपंचपद मनसेकडे असले तरी उपसरपंच राजेश सालकर आणि मनसेच्या महिला तालुका उपाध्यक्ष जाई किणी यांच्यासह रुचिता रामचंद्र वाघात (ग्रामपंचायत सदस्य केळवे), अमृता मनिष पटकर (ग्रामपंचायत सदस्य केळवे), स्वप्ना संदेश गवारी (ग्रामपंचायत सदस्य केळवे), चंदन अरुण ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य केळवे), सूरज सुरेश उंबरसाडा (ग्रामपंचायत सदस्य केळवे), जयेश वांगड (अध्यक्ष आदिवासी विकास प्रतिष्ठान केळवे) माजी ग्रामपंचायत सदस्य (केळवे) आदींनी शिवसेना पक्षात जाहीर घेतल्यामुळे आपली शिवसेना अधिक बळकट होईल असे ते पुढे म्हणाले यावेळी शैलेश माळी (उपाध्यक्ष आदिवासी विकास प्रतिष्ठान केळवे), महेंद्र मोहनकर (आदिवासी एकता प्रतिष्ठान केळवे सदस्य), प्रतिक प्रकाश बघत (आदिवासी एकता प्रतिष्ठान केळवे सदस्य), सौ. ललिता उमतोल (आदिवासी एकता प्रतिष्ठान केळवे खजिनदार), साईनाथ राऊळ (शाखा प्रमुख केळवे), स्वजित उमेश चौधरी (उप शाखाप्रमुख मनसे केळवे) यांच्यासह डॉ. राजेश राय, अनिश राऊत, दीप सावे, मनिष पटकर, मनोज बसवत, अर्जुन बोस, अमोल बोस, अमित भुरकुड, मयूर धापशी, अनिल पडवळे, रोहित वनगा, निखिल भोईर, देवेंद्र सावे, तेजस पाचलकर, सुमित उंबरसाडा यांनी या पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी आमदार राजेंद्र गावित, केदार काळे, वैदेही वाढाण, समीर मोरे आदींनी आपल्या पक्ष बळकट करण्यासाठी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
07:46