महाराष्ट्र

सफाळे पोलीस ठाणे हद्दीत चोरांचा धुमाकूळ… अज्ञात चोरांनी तीन दुकाने फोडून.. रोख रक्कम केली लंपास

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर तालुक्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी पहाटे 2 वाजल्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सफाळे येथील 3 दुकाने फोडली आहेत. यापैकी दोन दुकानाचे शटर फोडण्यात या चोरांना अपयश आले आहे. तर या पैकी दोन चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत.या चोरीमुळे सफाळे परिसर भीतीचे वातावरण पसरले आहे.

सफाळे बाजारपेठेतील मराठा बेकरी येथे चोरट्यांनी शटर वाकवून या दुकानातील रोख रक्कम 20 हजार रुपयांची चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे. तसेच अजय इलेक्ट्रॉनिक्स,दृणाली इमिटेशन ज्वेलरी ही दुकाने सुद्धा या चोराने फोडली असून या दुकानातून या चोरांच्या हाती कुठलाच मुद्देमाल सापडला नाही . या चोरीच्या घटनेबाबत सफाळे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button