महाराष्ट्र

विजेच्या विद्युतीकरण साधनांची दुरुस्ती करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे (गट) पक्षाची मागणी

माळशिरस तालुका प्रतिनिधी —- फरहान मुलाणी
मो. 9975 013 492

सध्या पावसाळी दिवस चालु आहेत,तालुक्यात ठिकठिकाणी लाईट चे पोल वाकलेल्या अवस्थेत आहेत,अनेक ठिकाणचे डि.पीं.ची अवस्था खराब आहे,त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेचे जिवीतास बऱ्याच ठिकाणी धोकादायक स्थिती आहे,अशा वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करुन लाईट पोलबदलुन,डिपींना दरवाजे बसवने,आडवी येणारी झाडे तोडने,तारांमध्ये असनाऱ्या जंप पाहणी करुन दुरुस्ती करणे अशा सर्व विद्युतीकरण साधनांच्या दुरुस्ती करावी

यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका व युवासेना माळशिरस तालुका यांचेवतीने अकलूज येथील महा विद्युत वितरण केंद्र अकलूज येथील वरीष्ठ अभियंता मा.काळे यांना सदर निवेदन देण्यात आले,यावेळी शिवसेना प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके,माळशिरस तालुका प्रमुख संतोष राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे,शिवसेना नेते दिपक खंडागळे,तालुका सचिव चंद्रकांत देवकर, अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे, माळीनगर मा.शहरप्रमुख लक्ष्मण डोईफोडे, युवासेना मा.तालुका उपप्रमुख मिलींद मोरे, संदिप कदम, मितेश घाडगे,सागर साळुंखे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button