महाराष्ट्र

अल्पसंख्यांक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी यांची निवड

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अद्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षते खाली बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी अल्पसंख्यांक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी श्री.इद्रिस मुलतानी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने व सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने कामाला लागण्याचे आदेश दिले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी केनिकर,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.एजाजभाई देशमुख, अल्पसंख्यांक मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री वसीम आर खान,अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्री.अतिख खान, अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री मेराज खान, प्रदेश सरचिटणीस श्री.जुनेद खान, श्री सलीम जहांगीर, श्री महबूब खैरवा, श्री नजीर जमादार व सर्व प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button