महाराष्ट्र राज्यातून स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या जनक देवरे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील डहाणू सेंट मेरीज हायस्कूलचा इयत्ता आठवी मध्ये शिकणारा जनक सुनील देवरे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून 97.3154 टक्के गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.

जनक सुनील देवरे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सेंट मेरीज हायस्कूलच्या या विद्यार्थ्याने संपादन केलेल्या या यशामुळे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनक देवरे सह त्याच्या पालकांचे व शिक्षकांचे कौतुक केले जात असून सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी सेंट मेरीज हायस्कूल मध्ये जाऊन जनक देवरे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी डहाणू पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे, गोपनीय शाखेचे अंमलदार हेमंत गवळी, सेंट मेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सिरील लोपीस, पर्यवेक्षिका सौ. नीता वास, सहसचिव श्री.हेमंत पांचाळ, श्री लक्ष्मीकांत भंडारी, सौ.माधुरी दहिवलकर, सौ. दिलशाद डिसूझा, श्री.क्लाईव्ह सर, आरती भंडारी,सौ.सोनल जोशी सह आधी शिक्षक उपस्थित होते.



