“तस्मिया” आणि “अदील साहब” यांच्या विवाह सोहळ्याचा रिसेप्शन कार्यक्रम पुणे येथे मोठ्या थाटामाटात संपन्न…
महाराष्ट्राच्या बागवान समाजातील अनेक दिग्गजांनी लावली उपस्थिती…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
अकलूज चे प्रसिद्ध उद्योगपती हाजी जहांगीर शेठ बागवान चौधरी यांची नात आणि हाजी जमीरभाई बागवान चौधरी यांची सुकन्या “तस्मिया” आणि पुणे येथील प्रसिद्ध स्क्रॅप उद्योजक असलेले हाजी युनूसभाई बागवान यांचे चिरंजीव “अदील” उर्फ निहाल यांचा विवाह सोहळा येथील “कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हॉल” येथे रविवार दि 19/01/2025 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता,काल 21/01/2025 रोजी याच विवाह सोहळ्याचा रिसेप्शन कार्यक्रम पुणे येथील फातिमा नगर च्या जहांगीर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता…
या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शन साठी महाराष्ट्राच्या बागवान समाजातील अनेक दिग्गज असामींनी उपस्थिती दर्शविली हे विशेष,या मध्ये पुणे बागवान समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष जावेदभाई बागवान आपल्या संपुर्ण टीम सह आवर्जुन उपस्थित राहत रिसेप्शन कार्यक्रमावर बारकाईने लक्ष ठेवत आलेल्या सर्व पाहुण्यांचा स्वागत करत होते…
या वेळी अय्युबभाई,हाजी युनूसभाई बागवान यांनी आलेल्या सर्व आप्तेष्टांचे त्यांच्या परिवारा तर्फे पुरुष मंडळींना शाल आणि महिला मंडळींना ओढणी तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करत होते…
काल संपन्न झालेल्या या शाही रिसेप्शन सोहळ्या प्रसंगी वधु वरांना शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध शहरातून आलेले बागवान समाजाचे प्रतिनिधी लक्ष वेधून घेत होते…
या वेळी अकलूज येथून शहर बागवान जमातीच्या सदस्यासह व्यापारी,मित्र,पत्रकार मंडळी,तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत चे सर्व माजी सदस्य यांच्या सह सांगली,वाळवा,सोलापूर,पुणे,इंदापूर,सातारा,कुर्डूवाडी,वाई,पंढरपूर येथील पाहुणे रावळे मोठ्या प्रमाणात हजर होती…
या शाही रिसेप्शन सोहळ्यामध्ये विविध प्रकारचे सरबत,आइसक्रीम,पाणीपुरी,पान स्टॉल सह मच्छी,चिकन आणि मटणाचे विविध प्रकारावर आलेले सर्व पाहुणे यथेच्छ ताव मारत असताना,मटण बिर्याणीने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते…
सदरच्या रिसेप्शन सोहळ्याचे “परफेक्ट” नियोजन नवरदेव असलेल्या “अदील साहब” यांच्या बंधूंनी आणि मित्र मंडळीनी केले होते…
कायम स्मरणात राहील असा “माशअल्लाह” विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झाल्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाने चौधरी – बागवान परिवार यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव केला…
या वेळी बारामती,मुंबई,सोलापूर,परभणी,सातारा,अहमदनगर,सोलापूर,सांगली जिल्ह्यातील बागवान समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते…