पालघर सफाळे एडवण येथील आशापुरी देवीच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी करणारा चोर जेरबंद… पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांची कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे एडवण गावातील आशापुरी देवीच्या मंदिरातील दानपेटी मधील रक्कम चोरी करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाला यश आले असून सध्या हा आरोपी केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या ताब्यात आहे.त्याला पालघर कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सफाळे एडवण गावातील आशापुरी देवीच्या मंदिरात शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी रात्री अडीच वाजता अज्ञात चोरांनी या मंदिरात असलेली पैशानी भरलेली दानपेटी फोडून या दानपेटीतील 10 हजार रुपयांच्या आसपास असलेली रक्कम चोरी करून पलायन केले होते.या पैकी एका आरोपीला सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने मुंबई येथून अटक केली आहे.

हा आरोपी मूळचा झारखंड येथील रहिवासी आहे.
सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, आणि पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, आणि त्यांच्या पथकासह केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी केली आहे.



