महाराष्ट्र

सयाजीराजे मित्र मंडळाच्या शाखेंचा अकलूजमध्ये धडाका…

🎯 आज जवळ जवळ 20 शाखांचे उद्घाटन,अकलूज मधील युवकांची एक फळी मोहिते पाटील गटा कडे…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

अल्पावधीतच आपल्या नेतृत्व कौशल्याने अकलूज आणि परिसरात युवकांची एक फळी निर्माण करून आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा “आरंभ” करणारे सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सबंध माळशिरस तालुक्यात खळबळ उडवून दिली असल्याने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे…

संग्रामसिंह मोहिते पाटील उर्फ अण्णासाहेब यांच्या वाढदिवसा पासून सुरु झालेला सयाजीराजे मित्र मंडळाचा आवाका आता थांबता थांबेना,या उलट त्या मध्ये जास्तीची भर पडत आहे,अकलूज मधील युवक विकासाच्या दृष्टिकोनातून जात असल्याचे चित्र सबंध अकलूज मध्ये पहायला मिळत असल्याने विरोधकांचे धाबे मात्र दणाणलेले आहेत…

सयाजीराजे मित्र मंडळाचा असाच धडाका पुढे कायम राहिला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळणे जिकरीचे ठरणार असल्याची चर्चा राजकारणातील “प्रकांड पंडित” करीत आहेत…

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी दिलेला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे तत्त्व अंगीकृत करत सयाजीराजे मोहिते पाटील यांची जोरदार वाटचाल सुरु आहे,एकंदरीत पणे जर पहायला गेलं तर एक नवे “युवा पर्व” सुरु झाले असल्याची प्रतिक्रिया अनेक जणांनी बोलून दाखवली…

आज 21/01/2025 रोजी सयाजी राजे मित्र मंडळाचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल,सर्व कार्यकर्त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे संध्या 4:00 वाजता उपस्थित राहणे….

शाखेच्या उद्घाटनाचे मार्ग खालीलप्रमाणे असेल

1)महर्षी चौक 2)प्रतापसिंह चौक 3) माळेवाडी 4)वेंकट नगर
5)समता नगर 6)गुरुनगर
7)शनी मंदिर 8)बागवान गल्ली
9)आंबेडकर नगर 10)अण्णाभाऊ साठे चौक 11)गणेश नगर 12)लोणकर वस्ती 13)रत्नपुरी (14)संग्राम नगर 65 बंगला15)पाटील वस्ती 16)गोल्डन बेकरी 17)राऊत नगर आव्हाड 18)जुना सराटी रोड 19)सदभाऊ चौक…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button