निधन वार्ता
आंबेडकर चळवळीतील “पँथर” दिलीप (सरकार) विठ्ठल मोरे यांचे निधन…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज येथील आंबेडकर चळवळीतील “पँथर” दिलीप (सरकार) विठ्ठल मोरे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 01/09/2025 रोजी दुःखद निधन झाले…

मृत्यसमयी त्यांचे वय 57 वर्षाचे होते.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली,दोन मुले,जावई,सुना,नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या अशा अचानक जाण्याने आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला…
“पँथर” दिलीप (सरकार) विठ्ठल मोरे यांच्यावर आज अकलूज येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले,या वेळी आंबेडकर चळवळीतील जुन्या काळातील “पँथर” सह बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…



