महाराष्ट्र

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ३७ कोटींचा निधी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर

इंदापूर, प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल 8378081147

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर करून निधीचा शुभारंभ केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामिल झाल्यापासून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा कमालीचे ॲक्शन मोडवर आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जलसंधारण विभागाच्या ५० कोटी निधीच्या विकासकामांची स्थगिती ऊठवून सत्तेतील त्यांची पॉवर दाखवली असतानाच २४ तासही उलटत नाहीत तोवरच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार भरणे यांनी इंदापूरसाठी निधी आणण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आमदार दत्तात्रय भरणे यांनी निधीचा शुभारंभ केला आहे.

आमदार भरणे म्हणाले की, आपण इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला असून प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची गंगा पोहचवली आहे. तरीसुद्धा निधीच्या बाबतीत मी समाधानी नसून तालुक्यातील थोडा बहुत राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. अजुन काही भागातील नागरिकांची रस्त्याच्या कामाची मागणी होती. या नागरिकांच्या मागणी दखल घेत येणा-या अर्थसंकल्पात तुमचा रस्ता मंजूर केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द गावकऱ्यांना दिला होता. त्यास अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागणीमध्ये ३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये

१) वरकुटे खुर्द, पिटकेश्वर, घोरपडवाडी मार्गाची सुधारणा करणे ( बिजवडी जोडमार्ग ते बारामती इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965) रस्ता करणे – 4 कोटी 50 लाख रुपये.
२) लासूर्णे ते कळंब रस्ता करणे-10 कोटी
३) बावडा ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता करणे – 9 कोटी
४) अकोले ते बोरी रस्ता करणे – 1.5 कोटी
५) टणू ते चव्हाणवस्ती बंधारा ते गावठाण रस्ता करणे – 4 कोटी
६) वालचंदनगर सराफवाडी रेडा शहाजीनगर भोडणी रस्ता करणे -4 कोटी
७) सणसर ते रायतेमळा खटके वस्ती रस्ता करणे – 4 कोटी

अशा ३७ कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे. पुरवणी अर्थसंकल्प यादीमध्ये इंदापूर तालुक्यातील दळणवळणच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला डाळज नं.2 ते कळस जंक्शन वालचंदनगर ते नीरा नदी पुणे जिल्हा हद्द या रस्त्याच्या डिपीआर साठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा रस्ता जवळपास 26 किमी चा असल्याने लवकरच या रस्त्याला सुध्दा भलामोठा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button