सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे व टाइम्स 9 न्युजच्या दणक्यामुळे , अकलूज नगर परिषद खडबडून जागे— मुस्लिम दफन भूमीचे कंपाऊंडचे काम सुरू

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . ——-97 30 867 448
अकलूज नगर परिषदेचे मुस्लिम समाज दफन भूमी कडे दुर्लक्ष या मथळ्याखाली “टाइम्स 9 मराठी न्यूज” ने बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीचा इफेक्ट आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या अकलूज नगर परिषद खडबडून जागे झाले आणि आज दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी दफनभूमी वॉल कंपाऊंडचे उर्वरित काम चालू झाल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले

संपूर्ण आशिया खंडात अग्रेसर असलेल्या अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झालेल्या नगरपरिषद हद्दीत मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र असलेल्या दफनभूमीमध्ये जनावरांचा सुळसुळाट होत आहे तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही व सदर कब्रस्तानच्या कंपाऊंडची भिंती देखील पडलेल्या आहेत. सदरच्या संरक्षण भिंती ह्या पडलेल्या असल्यामुळे जनावरे त्या ठिकाणी धुमाकुळ घालत आहेत.

त्यामुळे समस्त अकलुज शहर मुस्लिम समाजामध्ये तीव्र असंतोष व चीड निर्माण होत होती व समाजाच्या भावना दुखावल्या जात होत्या. यापुर्वी देखील नगरपरिषदेला वारंवार तक्रारी करुन देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तरी दफनभूमीमध्ये होत असलेला जनावरांचा धुमाकुळ , अस्वच्छता , दफनभूमीच्या जागेत झालेले अतिक्रमण , संरक्षण भित नादुरुस्ती इत्यादी समस्या वर लवकरात लवकर आपले स्तरावरून कार्यवाही करावी अन्यथा याबाबत कार्यवाही न झाल्यास समस्त अकलुज शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने व सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व जिल्हा सचिव फिरोज देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते

तसेच यासंदर्भात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दफन भूमीच्या समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात असा आदेश अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनाही भ्रमणध्वनी वरून दिले होते . त्यामुळे नगरपरिषद प्रशासन जागे होऊन कामास प्रारंभ केला त्याबद्दल नगर परिषदेचे समाजाच्या सर्व स्तरातून आभार मानले जात आहे



