विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच एखादी कला आत्मसात करावी– जयसिंह मोहिते पाटील.

अकलूज (प्रतिनिधी) शकुर तांबोळी
शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त परीक्षा पद्धतीमुळेच आज विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झालेली दिसते. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच एखादी कलाही आत्मसात करावी असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
स्मृतीभवन शंकरनगर येथे शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता १० वी व १२वी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या १९९ गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनीचा व त्यांच्या पालकांचा सत्कार जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
या समारंभास संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, अँड. नितीनराव खराडे पाटील, संचालक पांडुरंग एकतपुरे, राजाभाऊ लव्हाळे ,रामभाऊ गायकवाड , वसंतराव जाधव, निशाताई गिरमे, उत्कर्ष शेटे, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

प्रस्ताविकात संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, २३ जून १९४८ साली सहकार महर्षीनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. यावर्षी संस्थेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाने माळशिरस तालुक्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. संस्थेने कायमच दर्जेदार शिक्षण दिले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. 28 हजार 370 विद्यार्थी व 1189 शिक्षक या संस्थेत काम करतात. कोविडच्या काळात सामाजिक बांधिलकी जपली. बाळदादांनी सुरू केलेल्या संयुक्त परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ झाली. संस्था आधुनिकतेची कास धरून विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवण्यासाठी कार्यरत असल्याचेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थिनीश्रुती चव्हाण हीनेही आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता 10 व 12 वी मध्ये संस्थेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास रोख रुपये 11 हजार, द्वितीय 9हजार, तृतीय 7हजार तर विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रुपये 2 हजार100 रोख, प्रमाणपत्र श्रीफल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभात १०वीचे ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले११७ गुणवंत विद्यार्थी तसेच शाखावर प्रथम आलेले १३ असे १० वीचे एकूण १३० विद्यार्थ्यांचा, इयत्ता १२ वी च्या ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले ६२ विद्यार्थी, विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केलेले ४ विद्यार्थी, व्यवसाय विभागात संस्थेत प्रथम १ विद्यार्थी, शाखावर प्रथम आलेले २ विद्यार्थी असे १२वीचे एकूण ६९ विद्यार्थी, व इयत्ता १०वी व १२वीचे एकूण १९९ गुणवंत विद्यार्थींचा समावेश होता.
इयत्ता१०वी मध्ये संस्थेत प्रथम आलेले कु. अनुष्का केदारी ९७% (जिजामाता कन्या प्रशाला), द्वितीय कु. श्रुती चव्हाण ९६.८०% (पळसेश्वर विद्यालय पळसमंडळ), तृतीय चिरंजीव पुष्पराज मेहता ९५.८०% (समावि अकलूज).इयत्ता १२वी मध्ये संस्थेत प्रथम आलेले कु. इकरा शेख ९३% (समावि अकलूज विज्ञान शाखा), द्वितीय कु. प्रांजली सावंत ९२.५०% (समावि विज्ञान शाखा), द्वितीय विभागून कु. पूर्वा गांधी ९२.५०% (क.बा.पा. विद्यालय सदाशिवनगर वाणिज्य शाखा), तृतीय कु. सानिका सूर्यवंशी ९१.३३% (समावि अकलूज विज्ञान शाखा) यांच्याबरोबरच कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम यामध्ये प्रथम तीन आलेले विद्यार्थी यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, पी एम पवार व आर आर पाटील यांनी केले यांनी केले.
सारे जहाँ से अच्छा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



