महाराष्ट्र

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकलूज खंडाळी येथे 17 ऑगस्ट 2023 च्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकलूज खंडाळी, ता. माळशिरस जि. सोलापूर येथे प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ ची प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरु करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्य पद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी या किंवा नजीकच्या औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा. व त्यांनतर विकल्प सादर करावेत म्हणजेच ट्रेड निवड फॉर्म भरावा. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्याबाबत या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येत आहे.

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एक वर्ष कालावधीचे अनुक्रमे संधाता, वुड वर्कर टेक्निशन, डिझेल मेकॅनिक व कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट हे व्यवसाय उपलब्ध आहेत व दोन वर्ष कालावधीचे अनुक्रमे कातारी,जोडारी, तारतंत्री, वीजतंत्री, यांत्रिक मोटार गाडी व मेकॅनिक ऍग्रीकल्चर मशिनरी असे एकूण ०६ व्यवसाय प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी एकूण २४४ जागा उपलब्ध आहेत. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आय टी. आय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्याक्रम पूर्ण केल्यांनतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यांनतर बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते .

तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते कि आयटीआय तुन व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे असे आवाहन प्राचार्य श्री.ओंबासे व गटनिदेशक श्री. प्रकाश मोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button