महाराष्ट्र

करमाळा तालुक्यावर दुष्काळाचे संकट असून पंधरा मिनीटात आढावा बैठक संपते कशी, पाटील गटाकडून आक्षेप

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आमदार मामांचे करमाळा तालुक्याकडे जाणीवूर्वक दुर्लक्ष असून नारायण आबाच आमदार पाहिजे होते असा जनतेतून सुर निघतो आहे त्या पाठीमागे वास्तव उभे असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर  यांनी सांगितले.करमाळा तालुक्यात सद्या दुष्काळाचे संकट पसरले असून यावरून आज पाटील गटाकडून विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करण्यात आला.

याबाबत अधिक उघडपणे बोलताना तळेकर यांनी सांगितले की करमाळा तालुक्यात सध्या वीज महावितरण कडून वीज पुरवठा सतत खंडित केला जात आहे. उजनी काठच्या गावांना शेतिपंप चालवता येत नाहीत तर दुसरीकडे मलवडी सारखे गाव आज कित्येक दिवस अंधारात ठेवले जात आहे.अनेक गावात ही समस्या आहे. वीज कर्मचारी कोणताही आदेश न दाखवता वर्तमान पत्रामध्ये आलेली राज्याच्या वीज टंचाई बाबतची बातमी उत्तर म्हणून शेतकऱ्यांना दाखवत आहेत.दुसरीकडे चारा व पाणी टंचाई बाबतची आढावा बैठक केवळ पंधरा मिनिटात उरकुन आमदार महोदय करमाळा तालुक्यातून पळ काढत आहे.

जेंव्हा शेतकरी निवांत असेल तेंव्हा गाव भेट दौरा करायचा आणि ज्यावेळी शेतकरी अवकाळी पावसाने त्रस्त, चारा व पाणी टंचाईने त्रस्त, वीज कपातीमुळे त्रस्त, वीज बिल वसुली मुळे त्रस्त असेल तेंव्हा करमाळा तालुक्यात यायचेच नाही या आमदार महोदयांच्या कामकाज पद्धतीला आता जनता त्रस्त झाली असल्यानेच आमदार म्हणुन नारायण आबा पाटील हवे अशी उघड प्रतिक्रिया नागरिक, वृध्द,महिला, युवक शेतकरी v शेतमजूर गावपारा वर देत आहेत.

तालुक्यावर दुष्काळाची छटा गडद होत आहे आणि आमदार मात्र काचेच्या महालात आराम करण्यात धन्यता मानत असल्याचे वास्तव जनतेला स्वीकारावे लागत आहे हे या मतदार संघाचे दुर्दैव असल्याची तिखत प्रतिक्रिया यावेळी तळेकर यांनी दिली. तर उद्या उजनी काठच्या शेतकऱ्यांची वीज जोड उजनीचे पाणी राखून ठेवायचे या सबबीखाली सुरू झाली तर माजी आमदार नारायण पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी तळेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button