शहर

रमजान महिन्यानिमित्त व नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ लुमेवाडी येथील हाफीजसाहब यांच्या दर्गास तांबोळी परिवारा कडून वाॕटर फिल्टर चे लोकार्पण

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

इस्लाम धर्मात रमजान महिन्यात दानधर्म करण्याला अनन्य साधारण महत्व असून तितकेच महत्व एखाद्या रोजदाराला पाणी पाजण्याला आहे एखाद्या माणसाने एक पुण्ण्याचे काम केले तर त्याला एकच पुण्य प्राप्त होते मात्र त्या माणसानै रमजान महिन्यात एक पुण्णयाचे काम केले तर त्याला 1 ऐवजी 70 पुण्य प्राप्त होते त्यामुळे या महिन्याला इस्लाम धर्मात दानधर्म( सदका फितरा जकात खैरात ) याला फार महत्त्व आहे

त्या अनुषंगाने अकलूज येथील मुख्तार इलेक्ट्रॉनिक्स व इनाया मेडिकल स्टोअर्स चे चालक मुबारक शेखलाल तांबोळी व मुक्तार शेखलाल तांबोळी आणि मुस्तफा शेखलाल तांबोळी यांच्या वतीने त्यांचे नातेवाईक व मुबारक यांचे सासरे –युनुस अहमद आतार सासू –छन्नूबी आतार व मुख्तार आणि मुस्तफा यांचे मामा –तय्यब युनूस आतार यांच्या (ईसालेसबाब) स्मृती प्रित्यर्थ

लुमेवाडी ता. इंदापूर जि.पुणे.येथील दर्गावर थंड पाण्याचे 50 लिटरचे पाणी फिल्टर बसवून दर्गाला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तसेच सध्या रमजान महिन्यात उपवास करणाऱ्याची (रोजदारांची) सोय केल्याने त्यांचे लुमेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button