राज्यातील शिक्षणाशास्ञ महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाने 100 % अनुदान द्यावे या मागणी साठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाचा 35 वा दिवस

उपसंपादक ——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
सन 2001 पूर्वीच्या महाराष्ट्रातील 89 शिक्षणशास्त्र महाविद्यालयां ना महाराष्ट्र शासनाने 100 टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सोमवार, दिनांक :- 27 मार्च 2023 रोजी 35 वा दिवस. या आंदोलनाची व अनुदानाच्या आत्तापर्यंतच्या कार्यवाही ची मुंबईच्या आझाद मैदानावर माहिती देताना संघटना अध्यक्षा प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी. आंदोलनात सहभागी झालेले

यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर या कॉलेजचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील ( खुर्चीत बसलेले डावीकडून पाहिले), इतर कॉलेज चे प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या आठवडाभरात भेट घेण्यात येणार आहे. आज सायंकाळी मंत्रालयातील मुख्य सचिव रस्तोगी यांची संघटना अध्यक्षा डॉ. मेघा गुळवणी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी अनुदान मागणी विषयी चर्चा केली.



