देशात परत कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारावर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आले आढळून

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 1,805 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी 1,890 कोरोना रुग्ण आढळून आले होते आणि 7 मृत्यू झाले होते.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्ण 10,300 पर्यंत वाढले आहेत, ही नोव्हेंबरपासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहेत. यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी देशात 11084 सक्रिय रुग्ण नोंदवण्यात आले होते.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथील रुग्णांची वाढ पाहता चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मुंबईतील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्ड सुरू झाले आहेत. त्याचबरोबर सरकारने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना स्टँडबाय मोडमध्ये राहण्यास सांगितले आहे. यासोबतच लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



