रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी देशमुख तर
व्हाईस चेअरमन पदी सुजित तरंगे

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्यीज नेटवर्क
मो. 9730 867 448
कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी कल्याणराव देशमुख तर व्हॉइस चेअरमन पदी सुजित शांतीलाल तरंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व राजसिंह मोहिते पाटील हे संस्थापक असणाऱ्या रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली यामध्ये संचालक मंडळ बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली
यामध्ये चेअरमन पदासाठी शिवाजी देशमुख तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुजित तरंगे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी जी बी जाधव यांनी बिनविरोध घोषित केले.संस्थेचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,संचालक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कृषी क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. चाळणी युनिट, बीजोत्पादन कार्यक्रम, प्रोसेसिंग युनिट, आडत विभाग,चारा बियाणे विक्री, औषधे व बियाणे विक्री विभाग आदी कामकाज या संस्थेच्या माध्यमातून केले जाते.

यावेळी शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, संभाजी विश्वासराव कदम, संदीप सुरेश घाडगे, आनंद भिकलिंग तोडकरी, दत्तात्रय भिमराव मुंडफणे, पुष्पलता दिलीप पाटील, सागर सावता यादव, महादेव मुरलीधर साबळे आदि नूतन संचालक मान्यवर उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मॅनेजर दिलीप शिरसट व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी नूतन चेअरमन,व्हाईस चेअरमन यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला तर उज्वलाताई हनुमंत सरगर यांची कचरेवाडीच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल, रत्नमाला सुजीत तरंगे यांना महाराष्ट्र शासनाचा पुणे विभागीय द्वीतीय वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल व शोभाताई वाघमोडे यांची एजेएफसी या पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

“शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रमाची माहिती देणे व राबविणेसाठी प्रवृत्त करणे,बिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांना बियाण्यांची अनुवंषीकता , भौतिक गुणवत्ता टिकविणेसाठी व त्यापासून होणाऱ्या फायद्याबाबत मार्गदर्शन करणे,शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे तयार करून देणे,शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारे नविन सुधारीत तसेच संकरीत वाण उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न करणे,दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये अधिक चारा देणाऱ्या वाणाच्या बियाणाचे उत्पादन करणे , बियाणे उपलब्ध करुन देणे व मार्गदर्शन करणे,शेतकऱ्यांनी शेतामध्ये उत्पादीत केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देणेसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या फळे व भाजीपाला विक्रीसाठी वेगवेगळी बाजारपेठ उपलब्ध करून देणे,शेतकऱ्यांच्या पिक संरक्षणासाठी किटकनाशके , बुरशी नाशके , तणनाशके उपलब्ध करुन देणे आदी उद्देशाने संस्थेचे कार्य सातत्याने सुरू असते.”

- धैर्यशील मोहिते पाटील
मार्गदर्शक संचालक, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बिजोत्पादक सहकारी संस्था,अकलूज
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त उत्तम बियाणे व शेती औषधे,जातिवंत कलमी रोपे, शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
- शिवाजी देशमुख
नूतन चेअरमन, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्था




