सर्वांनी रोजच्या आहारात भरड धान्याचा उपयोग करावा-लाला साहेब झेंडे यांचे आवाहन

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
“भरड धान्य पौष्टिक असल्याने सर्वानी त्यांचा दररोज आहारात उपयोग करावा, ” असे आवाहन येथील यशवंत विद्यामंदिर , कोडोली ता. पन्हाळा जि.कोल्हापूर चे मुख्याध्यापक लालासाहेब झेंडे यांनी केले.
येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने शाळकरी गरीब विद्यार्थ्यांना मोफत भरड धान्य ( तृणधान्य) देण्यात आले. त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून लालासाहेब झेंडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. प्रारंभी विद्येची देवता सरस्वती आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. पाहुण्या ना वृक्ष देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गरीब कुटुंबातील शाळकरी विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते भरड धान्याचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले, " पालकांनी आपल्या मुलांना दररोज भरड धान्या पासून बनविलेले पदार्थ खायला द्यावेत. पौष्टिक आहारा मुळे मुले धष्टपुष्ट होऊन ती निरोगी राहतील,. परिणामी त्यांची बुद्धी सुदृढ होईल. शेतकर्यांनी देखील मोठ्या प्रमाणात भरड धान्याचे उत्पादन घेतले पाहिजे. "
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभागाने केले. विद्यार्थी – शिक्षिका स्वप्ना ली कांडगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापिका श्रीमती जी. के. मुजावर यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डी. डी. पाटील, यशवंत विद्यामंदिर च्या शिक्षिका श्रीमती श ब्बू मुजावर आदी व्यासपीठावर होते.



