प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सावळजकर व कर्णवर यांचा सन्मान

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज ता. 28 : सोलापूर जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने प्राध्यापक सावळजकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त तर अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विजया कर्णवर यांचा सन्मान करण्यात आला.
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्र विभागात गेली 37 वर्ष कार्यरत असणारे प्रा. सावळजकर यांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन यावर व्याख्याने देत प्रबोधन केले असून ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत या सेवानिवृत्ती निमित्त त्याचा सन्मान सोलापूर जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सौ विजया कर्णवर यांचा सोलापूर जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.



