पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्याची मनोभावे सेवा – डॉ अभय तिडके

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123
“संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्याची मनोभावे सेवा केली,” असे कौतुक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय तिडके यांनी केले.
सराटी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या प्रसंगी आरोग्य उपकेंद्राला भेटीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन एडके, डॉ उत्तम कांबळे, डॉ निगुट, डॉ सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी युनूस शेख, डॉ. अभिषेक ताटे, डॉ ज्ञानेश्वर बाहेगावकर, डॉ शुभांगी चाळक, डॉ. अनिश शेख, डॉ. सुमित्रा कोकाटे, डॉ मेघा हस्ते, बाबूशा ईश्वरकट्टी, आयुब तांबोळी, इब्राहिम मकानदार, आशासेविका रेश्मा सय्यद, पूजा जगदाळे, स्वाती खरात, बशीरा शेख, सुनिता जगदाळे, संध्या देवकुळे, प्रदिप बोडरे, गोपाळ ढगे, उमाकांत भोपळे, साजन चव्हाण, महेश पवार, बाबा मोरे, नरेश सावंत राव, सचिन जाधव, प्रदिप पवार आदी उपस्थित होते.

डॉ अभय तिडके म्हणाले, “संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जिल्ह्यातील शेवटचा सराटी मुक्कामी येईपर्यंत उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशासेविकांनी भाविक व वारकऱ्यांची उत्कृष्ट नियोजन करत सेवा बजावली. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशाच पद्धतीने सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा द्यावी. तसेच, उपकेंद्राची स्वच्छता, रंगरंगोटी, औषधांचा मुबलक प्रमाणात उपलब्धतेमुळे सर्व सेवा उत्कृष्ट पद्धतीने देता आली. “
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या समवेत “मोटारसायकल आरोग्यदुत” हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यांनी वारकऱ्यांची जागेवरच मनोभावे सेवा केली.



