स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भजन आंदोलनाच्या धसक्याने प्रशासनास खडबडुन आली जाग

बोरगाव ते माळेवाडी (बोरगाव) या जोड रस्त्याची डागडुजीस प्रशासनाकडून प्रारंभ ..
उपसंपादक –हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भजन आंदोलनाच्या दशक्याने प्रशासन खडबडून जागी झाले आणि नरमले बोरगाव ते माळेवाडी बोरगाव या जोड रस्त्याची डागडुजी करण्यास प्रशासनाकडून प्रारंभ झाला आहे त्यामुळे
आंदोलनकर्ते शिवराम गायकवाड यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश प्राप्त झाले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज,आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पंढरपूर(NHAI) या विभागाने लेखी आश्वासन दिले व खड्डे बुजवन्याचे काम प्रशासनाने चालू केले आहे यामुळे दिनांक 25 जून 2023 रोजी होणारे भजन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले..

भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण पंढरपूर यांनी आंदोलनकर्ते शिवराम गायकवाड यांना लेखी पत्राद्वारे रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. सदर बोरगाव ते माळेवाडी (बोरगाव) जोड रस्त्याचे खड्डे बुजवन्याचे व दुरुस्त करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पंढरपूर या विभागाच्या वतीने रस्त्याचे काम प्रशासनाने चालू केले आहे यामुळे बोरगाव पंचक्रोशीतील वारकरी, शेतकरी,कामगार,शाळकरी – विद्यार्थी,नागरिक यांच्या चेहऱ्यावर व पंचक्रोशित आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे




